हत्या की आत्महत्या परिसरात चर्चांना उधान
नवरगाव येथील धरणाजवळ आढळला मृतदेह
सुरेश पाचभाई विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,
तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ आज दिनांक २७ मार्च २०२४ रोज बुधवारला सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह आढळून आल्याने मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाशेजारी विषारी कीटकनाशकाची बॉटल आढळून आल्याने ही हत्या की आत्महत्या याची चर्चा मात्र तालुक्यात सुरू आहे.
मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरण हे पर्यटन प्रेमींयुगुलासाठी एक महत्त्वाचे स्थळ आहे.येथे अनेक प्रेमवीर आपली प्रेमाची भूक भागवण्यासाठी या ठिकानी येत असतात.येथे प्रेमयिगुलांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.अशातच आज एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडालेली आहे.
हा युवक वणी तालुक्यातील रासा येथील असून त्याचे नाव प्रज्योत भिमराव मुन वय अंदाजे 22 असे आहे.तो वणी येथे iti मध्ये शिक्षण घेत होता अशी माहिती असून
प्रज्योतचे वडील बांधकाम ठेकेदारीचे काम करत असून त्याला दोन बहिणी आहेत.त्यापैकी एका बहिणीचे लग्न झाले असून दुसरी बहीण एका कॉन्व्हेंट वर शिक्षिका म्हणून शिकवत आहेत. प्रज्योत हा एका मेडिकल स्टोर्सवर काम करायचा अशी माहिती आहे.
त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली हे अजून कळले नसले तरी त्याच्या मृतदेहाशेजारी विषारी कीटक नाशकाची बॉटल आढळून आल्याने ही आत्महत्या की हत्या? अशी चर्चा मात्र तालुक्यात रंगत आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.