शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान
ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामणी
काल रविवारी दिनांक 12 मे 2024 ला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान विज कोसळून दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना मार्की शिवारात घडली आहे.
यावर्षी उन्हाळा सुरू असला तरी दिवसा दोन दिवसा आड ढगाळ वातावरण वादळीवारा पाऊस नित्याची बाब झाली आहे.शेतात उन्हाळी मशागतीचे ,मुंग ,भुईमुग ज्वारी उन्हाळी पिकांच्या काढणीची लगबग चालू आहे.वादळी वारा पाऊस हा अडथळा ठरत आहे .काल दुपारी झरी मार्की परिसरात अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

अशातच शेतकरी दिवाकर रामदास ढेंगळे रा.मार्की यांच्या शेतात चरायला गेलेली बैल जोडी पावसामुळे कडूलिंबाच्या झाडाखाली आडोशाला उभे असताना अचानक त्याचवेळी कडूलिंबाच्या झाडावर विज पडल्याने झाडाखाली असलेले दोन बैल जागीच ठार झाले.

या जोडी ची किंमत अंदाजे एक लाख रुपये असल्याची शेतकऱ्याला सांगितले आहे.ऐण हंगामाच्या वेळी दोनबैल मरण पावले आणि शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान असून प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्या ला तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.