– मारेगाव तालुक्यातील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव,
घरची मंडळी काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्याची संधी साधत मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना मारेगाव तालुक्यामध्ये घडली.आईवडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 वर्षीय पीडिता ही मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे.ती तिच्या आईवडिला सोबत राहते.दिनांक 23 जून 2024 रोज रविवारला पीडितेच्या घरचे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. संध्याकाळी ते 4 वाजताच्या सुमारास परत आले तेव्हा त्यांना मुलगी घरी आढळून आली नाही.
त्या मुळे तिचा नातेवाईकाकडे व सर्व ठिकाणी शोधा शोध घेतला असता तिचा शोध लागला नाही.त्यांनी चौकशी केली असता त्यांना एका 22 वर्षीय तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला.वडीलांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपी विरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस करत आहे.