स्कूल बस बंद होण्याच्या मार्गावर
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,
पुराच्या पाण्यामुळे मार्की खु ते मार्की बु.या रोडवरील पुलावर कॉक्रीट वाहून गेले असून त्यावर अनेक खड्डे पडले आहे.या मार्गाने जाणाऱ्या लोकांना फुला वरून मार्ग काढणे कठीण झालेआहे.
मार्की खु ते मार्की बु.या दोन्ही गावांत २ किमी चे अंतर आहे मधात एका नाला असून १० वर्षापूर्वी त्यावर पुलाचे बांधकाम करण्यात होते.भष्ट्र अधिकारी यांच्या आशिर्वादाने कच्चे बांधकाम करण्यात आल्याने संपूर्ण फुल खिडखीडे झाला आहे.या वर्षी मे महिन्यात या रोडच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले.परंतु पुलाची डागडुजी करणे आवश्यक होते मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

सध्या सतत पाऊस सुरू असून पुराचा जोर वाढला आहे.पुराच्या पाण्यामुळे मधोमध चार फूट लांब रुंदीचे खड्डे पडले असून सिमेंट पाइप उघडे पडले आहेत.पुलावर पाणी वाहत असताना खड्डाचा अंदाज येत नाही.दुचाकी व चारचाकी वाहन खड्डयात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

अनेक शेतकऱ्यांना रोड महत्वाचा असून रासायनिक खते,शेती उपयोगी साहित्य,बैलगाडी टाकून नेतांना बैलांच्या पायांना इजा झाल्या आहेत.शिक्षणासाठी मार्की बु.येथे ३० ते ४० विद्यार्थी ये-जा करतात,मुकुटबन येथिल खाजगी शाळेची बस दररोज विद्यार्थ्यांची ने आण करत असून ती आता बंद होण्याची शक्यता आहे.सरकारी शाळेत शिक्षक नाही तर खाजगी शाळेत जायला रस्ता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.