पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह चे आयोजन
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क वणी,
वणी:- येथे उद्या दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोज रविवार ते 11 ऑगस्ट 2024 रविवार पर्यंत सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.या करिता सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय वरोरा रोड वणी येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

साहेबांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी श्री.सद्गुरु जगन्नाथ महाराज देवस्थान वणी येथे महाआरती करून भगव्या सप्ताहाला सुरुवात करण्यात येणार आहे.त्या नंतर 11 वाजता सदस्यता नोंदणी अभियानास सुरवात होणार आहे. तरी समस्त शिवसैनिक,शिवसेना पदाधिकारी,महिला पदाधिकारी,तथा युवा सेना पदाधिकारी यांनी उद्या सकाळी ठीक 10 वाजता येण्याचे आवाहन संजय देरकर वणी विधानसभा प्रमुख ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),योगिता ताई मोहोड (जिल्हा संघटिका ),डिमन ताई टोगे (उपजिल्हा संघटिका), संजय निखाडे (उपजिल्हाप्रमुख),शरद ठाकरे (उपजिल्हाप्रमुख),संतोष माहुरे (सहसंपर्कप्रमुख वणी विधानसभा), सुधीर थेरे (शहरप्रमुख),प्रसाद ठाकरे (प्रभारी तालुका प्रमुख) यांचे कडून करण्यात आले आहे.