ए.पी. विराणी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
सुरेश पाचभाई मारेगाव,
तालुकास्तरीय पावसाळी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पंचशील विद्यालय नवरगाव येथे संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ए.डी.चव्हाण,उद्घाटक म्हणून पंचशील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष ए.पी. वीरानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक मारेगाव बी.एस.काकडे होते.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना सुरवात झाली.यावेळी सुरुवातीला खो-खो या स्पर्धा घेण्यात आल्या. 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी या खो-खोच्या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी रांजणकर यांनी केले या कार्यक्रमाला आर. मोडक सतीश गौरकार,श्रीकांत गोहोकार, जाधव सर, आवारी मॅडम, उपरे मॅडम,गोहकार मॅडम, विलास मेश्राम यांनी सहकार्य केले.