सुरेश पाचभाई मारेगाव,
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या गेलेला गणवेशा हा निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समिती मारेगाव यांचे कडून गटशिक्षण अधिकारी मारेगाव यांना करण्यात आलेली आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून पुस्तक आणि गणवेश वाटप केल्या जातो.
याही वर्षी हा गणवेश शासनाने स्वतः पुरवलेला आहे.शालेय विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त होताच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , सचिव आणि सर्व सदस्य यांनी शाळेत जाऊन या गणवेशांची तपासणी केली. तपासणीअंती हा गणवेश निकृष्ट दर्जाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हा गणवेश परत करून उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचा असा गणवेश विद्यार्थ्यांना पुरवण्यात यावा अशा प्रकारची तक्रार मारेगाव येथील गटशिक्षण अधिकारी यांना केलेली आहे.
