ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी,
झरी तालुक्यातील मार्की येथील छोट्याशा गावातून भार्गव विनोद उलमाले यांची एम बी बी एस सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या पदवी करीता निवड झालेली आहे.मार्की या गावातून भार्गव हा पहिला विद्यार्थी आहे ज्यांची एम बी बी एस साठी निवड झाली आहे .विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन निट परीक्षा दिली.
Selection of farmer’s son for MBBS degree

त्यात त्यांना ६०७ गूण मिळाले असुन त्यांचे चवथी पर्यंतचे शिक्षण हे मुकुटबन येथे गुरुकूल कान्वेंट मध्ये घेतले आहे.त्यानंतर पाचवी ते १० वी पर्यंतचे शिक्षण बल्लारशा येथे घेतले.त्याने बल्लारशा येथे वस्तीगृहात राहून शिक्षण घेतले व पुढील १२ वी विज्ञान शाखेतील शिक्षण नागपुर येथे घेतले.शेतकरी कुटंबातील भार्गव विनोद उलमाले याने विपरीत परिस्तिथीतून प्राप्त केलेल्या यशाचे परिसरातुन कौतूक होत आहे .