आज १२ वा . मार्की बु. येथे अंत्यसंस्कार
ज्ञानेश्वर आवारे झरी जामणी
झरी जामणी मार्की बु.येथील सरपंच मारोती भिमराव येडमे वय ६५ यांचे कालरात्री ११ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.काल रात्री मंगळवार दि .८ आक्टोंबर रोजी दहा वाजेच्या दरम्यान त्यांना छातीत दुखायला लागल्याने त्यांच्या कुटुंबीय वणी कडे दवाखान्यात नेत असतांनाच रस्त्यातच गणेशपुर (ख) जवळ प्राणज्योत मावळली
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी ,सुना व नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.मोठा मुलगा सतीश शिक्षक,संदीप डॉक्टर,सचिन वनरक्षक असून मुलगी शिक्षका असून माजी आमदार राजू तोडसाम हे त्यांचे जावई आहे.मारोती येडमे हे मार्की गावचे विद्यमान सरपंच असून माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची ओळख होती.

परिसरात सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे .सामान्य परिस्थितीतून पुढे आलेले मारोती भाऊ यांना गरिबीची जाणीव होती.त्यांनी गरीब श्रीमंत असा कधी भेद केला नाही .लहान मोठ्या सोबत प्रेमाने वागत , त्यांच्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अनेकांना जवळ केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने मार्की गावावर तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.आज १२ वाजता त्यांचावर मार्की येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .