गोंडवाना संग्राम पार्टी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष डॉ.निरंजन मेश्राम यांच्या पत्राद्वारे जाहीर पाठिंबा
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव:-गोंडवाना समाज पार्टी राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष यांच्या ७७ राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री.उद्धव कपलू टेकाम यांना २० नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणूक महाराष्ट्र या निवडणुकीसाठी गोंडवाना संग्राम पार्टीचे समर्पित उमेदवार घोषित करून गोंडवाना संग्राम पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्री.उद्धव कपलू टेकाम यांना सहकार्य मदत करावी अशा आशयाचे पत्राद्वारे जाहीर पाठिंबा दिल्यामुळे श्री.उद्धव कपलू टेकाम यांना निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवार म्हणून मिळालेले बौद्ध चिन्ह जेवणाचे ताट मिळाल्यामुळे राळेगाव मतदार संघातील मतदा रात खुशीचे वातावरण पहावयास मिळत आहे.
त्याचप्रमाणे गोंडवाना संग्राम पार्टी समर्पित ८० आर्णी -केळापूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार व गोरगरिबांचे कैवारी व गरिबांचे सदैव सेवेत असणारे मनमिळाऊ स्वभावाचे लोकप्रिय उमेदवार म्हणून ख्याती असलेले डॉ.निरंजनभाऊ मसराम यांचे आर्णी -केळापूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक बौद्ध चिन्ह ऑटो रिक्षा चालकांचा व मतदारांचा बोलबाला मतदाराचे उत्साहातून पहावयास मिळत आहे.

मतदाराचा कल नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असा दिसत आहे.
राळेगाव ७७ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री.उद्धव कपलू टेकाम हे प्रत्यक्ष परिचय असून पोलीस खात्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे.उत्कृष्ट कबड्डी खिलाडी म्हणून परिचित आहे. मनमिळाऊ स्वभावचे व गोरगरिबांना दुःख जाणवणारे व दुःखात सामील होणारे उमेदवार मतदार संघात व इतर ठिकाणी परिचित असल्यामुळे आणि त्यांच्या कबड्डी खेळामुळे परिचयाचे असल्याने मतदाराचा कल नवीन चेहरा विधानसभेसाठी प्रतिनिधी म्हणून पाठविण्याची प्रतिक्रिया मतदारात दिसून येत आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना मिळालेले निवडणूक बौद्ध चिन्ह जेवणाचे अण्णांनी भरलेला ताटावर मतदारांची येथेच भोजन करण्याची इच्छा दिसत असून श्री.निरंजनभाऊ मसराम यांना आर्णी- केळापूर विधानसभा मतदार संघ ८० मिळालेल्या विधानसभा क्षेत्रातील मतदारांची ऑटो रिक्षात बसण्यासाठी मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दिनांक २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकिवर मतदारांचे लक्ष लागले आहे हे मात्र विशेष.