सुरेश पाचभाई मारेगाव
स्वामी विवेकानंद अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र मारेगाव यांचा नववा वर्धापन दिन स्वामी विवेकानंद जयंतीच्या पर्वावर दिनांक 12 जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विलास मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक प्रवीण खंडाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आशिष सर अचलपूर हे उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहेत.दिनांक 12 जानेवारी 2015 ला लावलेल्या या रोपट्याचे मोठ्या वाटवृक्षामध्ये रुपांतर झाले. या अभ्यासिकेचा विस्तार ग्रामीण भागात सुद्धा होत आहेत. याच अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक युवक वेगवेगळ्या नोकरीवर सुद्धा लागलेले आहेत. यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी सीमा आत्राम,अनामिका उईके, अविनाश टेकाम (सर्व ग्रामसेवक) सुहास उताणे, आरोग्य सेवक, मंगेश भेदुरकर, स्टेनोग्राफर, मनोज भेदुरकर एम.एस.एफ. इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन प्रवीण पोटे यांनी तर आभार प्रदर्शन शंकर सिडाम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करता राजेश मुरझडीसह अभ्यासिकेतील युवकांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती.