सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगांव तालुक्यातील हटवांजरी येथील जीवनविकास विद्यालयाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्नेह संमेलन काल दिनांक 24 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला रात्री 8 वाजता संपन्न झाले.

या कार्यमाचे अध्यक्षस्थानी कुंदनकुमार पु. महाजन (अध्यक्ष) जीवनविकास ब. सा. संस्था तर उद्घाटक स्वातीताई कु.महाजन (संचालिका) जीवनविकास ब. सा. संस्था घाटंजी, प्रमुख अतिथी सौ.प्रिया गणेश कुळमेथे सरपंच ग्राम पंचायत हटवांजरी,निखिल पी.कालेकार उपसरपंच ग्रा.पं.हटवांजरी,

अनिरुद्ध माथनकर पोलीस पाटील हटवांजरी,मोहनराव ठाकरे सर मुख्याध्यापक.जी.प.शाळा हटवांजरी,मनोज लांजेवार सर जि. प. सराटी (स. शिक्षक),मुकेश महाडूळे सर मुख्याध्यापक / प्राचार्य जीवनविकास विद्यालय हटवांजरी,सर्व शिक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा अविष्कार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.नृत्य,नकला,नाटक असे वेगवेगळे प्रकार सादर करीत मुलांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.या कार्यक्रमाला शाळेतली विद्यार्थी,विद्यार्थिनी,गावातील महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.