शिक्षक संघ 235 शाखा झरीच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी शालेय शिक्षण विभागाने काढलेला संच मान्यतेचा अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा . या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघ र.न. 235 शाखा झरीतर्फे शालेय शिक्षणमंत्र्यांना,तहसीलदार झरी जामणीमार्फत निवेदन पाठवण्यात आले.
२० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांना सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांना या संचमान्यतेत शुन्य शिक्षक दाखवले आहे. त्यामुळे भविष्यात शाळेत शिकवायला शिक्षकच राहणार नाही, परिणामी सर्व शिक्षण व्यवस्थाच मोडकळीस येईल. मराठी माध्यमांच्या शाळांपुढे तर या संच मान्यतेमुळे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.

तेव्हा हा अन्यायकारक संचमान्यता निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा असे निवेदन प्राथमिक शिक्षक संघ र. नं. 235 तर्फे पाठवण्यात आले. यावेळेस चित्तरंजन कडू ,गणेश बुट्टे ,विठ्ठल उईके, तुळशीदास आवारी,मारुती मेश्राम,नथुजी गेडाम,गजानन मासटवार, महादेव चाटे, विजय सहारे ,राजेश अक्केवार, संजय डांगे,
जयपाल रघुते,विनोद पोलशेट्टीवार ,विनोद सीडाम , गजानन इरले ,चंदू येडमे ,ताराचंद चव्हाण ,नारायण रोडावार , जयपाल रघुते , विनोद बोरकर, धर्मा मडावी , महादेव डुकरे ,ज्ञानेश्वर इटोळे ,निखिल खपले,नामसनवार, अनिल चेलपेलवार,गवळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.