भव्य शोभयात्रेचे आयोजन; शहरवासीयांनी जपली परंपरा
श्री.राम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांचे आयोजन
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 5 एप्रिल 2025 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजता भव्य मोटर सायकल रॅली नगर पंचायत मारेगाव येथून सुरुवात होईल तर दिनांक 6 एप्रिल 2025 रोज रविवारला सकाळी 9 वाजता.मूर्ती पूजन आणी दुपारी 2 ते 5 महाप्रसाद वाटप कार्यक्रमचे आयोजण करण्यात आले आहे .

आणि सायंकाळी 5 वाजता प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समितीतर्फे भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.अनेक वर्षांपासून मारेगावमध्ये ही परंपरा कायम आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त मारेगाव येथे रामरथाचे आयोजन करून भव्यदिव्य शोभायात्रा शहरातुन काढण्यात येणार आहे.

या शोभायात्रेमध्ये विविध देखावे असणार आहेत. प्रभु श्री.रामाची देखणी मूर्ती,आणि हनुमान यांच्या मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच, मारेगाव शहराला रामस्थ,या शिवाय,रामपालखी, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघणार आहे.
दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण मारेगाव नगरी भगवामय होईल.नगर पंचायत जवळील हनुमान मंदिर येथे संध्याकाळी 5 वाजता प्रभू श्रीरामांच्या रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल.

या मार्गाने निघणार शोभायात्रा..
■ ही शोभायात्रा हनुमान मंदिर नगर पंचायत मारेगाव येथून सुरू होऊन मार्डी चौक,स्टेट बँक मार्ग, राष्ट्रीय विद्यालय, बस स्थान चौक ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बाळासाहेब चौक,मार्गे पुन्हा हनुमान मंदिर येथे पोहोचेल आणि महाआरतीने समारोप होईल.या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभाग घ्यावा,अशी विनंती श्री.राम नवमी उत्सव समिती व बजरंग दल मारेगाव यांनी केले आहे.