शेतकऱ्याचे मोठे नुकसान
ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी
झरी : पाटण येथील सुनील आईटवार यांच्या स्वताच्या मालकीच्या शेत सर्वे नंबर 68 मध्ये काल आग लागून जवळपास सत्तर पाईप,2 स्प्रिकलर सट, जनावरांसाठी असलेला मोठ्या प्रमाणातील कडबा व कुटार तसेच शेती उपयोगी अवजारे जळून खाक झालेली आहे.
यात मोठे नुकसान झालेले आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली हे निश्चित पणे सांगता येतं नसले तरी कालचा वादळी वारा व ढगाळ वातावरणामुळे नैसर्गिक विजेमुळे आग लागली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,नेमके आगीचे कोणते कारण आहे ,हे कळू शकले नाही.

या घटनेमुळे सदर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे . यात सुदैवाने बैलजोडी बचावली आहे .शेतकरी सुनिल आईटवार यांनी तलाठी व कृषी सहाय्यकांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे .आगीमुळे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे .