यवतमाळ येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान
सुरेश पाचभाई मारेगाव,
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन 2022-23 या वर्षाकरिता मारेगाव तालुक्यातील समाज सेविका, युवाकीर्तनकार,भागवत कथा प्रवाक्त्या तथा नेहरू युवा केंद्र यवतमाळ च्या राष्ट्रीय युवा स्वयंसेविका कु. स्वाती किशोर ठेंगणे यांना प्रदान करण्यात आला.
अवघ्या 7 वर्षापासून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम घेऊन काम करणारे, शासनाच्या मेरी माटी मेरा देश,हर घर तिरंगा,
राज्यस्तरीय युवा संसद, बॉर्डर युथ एक्सचेंज, पर्यावरणीय जागृती, सुसंस्कार शिबीर आयोजन ,बालविवाह निर्मूलन,महिला सक्षमीकरण कार्यशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा,झाडे जगवा, पर्यावरणाचे संरक्षण करा, वृक्षारोपण करा, जागतीक तापमान वाढ या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वाती ठेंगणे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

मागील तीन वर्षातील कार्याची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने दि. १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथे शासकीय समारंभामध्ये मा. पालकमंत्री श्री. संजय राठोड साहेब, जिल्हाधिकारी श्री. विकास मीना, जिल्हाक्रीडा अधिकारी श्री. घनश्याम राठोड , पोलिस अधिक्षक श्री. कुमार चिंता,
जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबिय, शेकडो नागरिकाच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.