प्रमोद रा. मेश्राम,मारेगाव तालुका प्रतिनिधी
मारेगाव : आदिवासी जनसंग्राम संघटनेच्या मारेगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड संस्थापक अध्यक्ष चरणदास मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी सुधाकर मेश्राम, तालुका कार्याध्यक्षपदी शेषराज मडावी तर तालुका महासचिवपदी सचिन मेश्राम यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी चरणदास मेश्राम यांनी सामाजिक कार्य, संघटन उभारणी आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले. आदिवासी समाजातील तळागाळापर्यंत शासनाच्या विविध योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी प्रत्येक खेडे, तांडा, वाडी-वस्तीत संघटनेची शाखा स्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संघटनेच्या माध्यमातून समाजातील अन्यायाला वाचा फोडता येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात आदिवासी जनसंग्राम संघटनेच्या महाराष्ट्र महिला महासचिव सुषमा आर. किलनाक यांनीही मनोगत व्यक्त करून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


