मारेगाव तालुक्यातील (बोटोनी )गोदाम पोड येथिल घटना
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील (बोटोनी) गोदाम पोड येथे राहणाऱ्या अस्मिता गोपाळ टेकाम वय सुमारे 17 वर्ष या मुलीने गावा पासून काही अंतरावर एका शेतामध्ये असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 14 एप्रिल गुरुवार रोजी सकाळी 7 वाजेदरम्यान उघडकीस आली.
अस्मिता च्या पश्चात आई, वडील, व 4 बहिणी असा आप्तपरिवार आहे.
घटनेची माहिती मारेगाव पोलीस ठाण्यात मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस करीत आहे.


