मारेगाव तालुक्यातील विज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे महावितरण कडून आवाहन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्राची विजेची मागणी कमालीची वाढल्याने महावितरण कंपनीद्वारे तात्काळ भारनियमन करण्यात येत आहे. तात्काळ भारनियमन किती वाजता व किती वेळासाठी होईल याबाबत नियोजन केले जात नाही. मागणी वाढते व मागणी प्रमाणे विजेचा पुरवठा होत नाही त्यावेळी महावितरणच्या मुख्य कार्यालयातून स्थानिक कार्यालयांना भारनियमन करण्याबाबत आदेश प्राप्त होते.

आणि आदेशा वरुन तात्काळ भारनियमन करण्यात येते.
विजेची टंचाई लक्षात घेता मारेगाव तालुक्यात तात्काळ भारनियमन करण्यात येत आहे. तरी मारेगाव तालुक्यातील सर्व ग्राहकांनी महावितरणच्या या कठीण प्रसंगात भारनियमन केल्यास सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मारेगाव एस. एम. पाटील यांनी केले आहे..


