नास्त्यापेक्षा खर्रा महाग, दिवसाला मोजावे लागतात 100 रुपये

0
43

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
झरी जामणी व्यसन म्हणजे कुठल्याही  गोष्टीची सवय लागून माणसाचे मन त्यातच आनंद मानायला लागतात
माणसाला  कोणत्याही  गोष्टीचे व्यसन लागाले त्या शिवाय माणसाला करमत नाही . ती गोष्ट मिळवण्यासाठी  माणूस कितीही पैसे मोजायला तयार असतो .त्याला शरीराची काळजी व कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव राहत नाही.तंबाखू  अशाच प्रकारचे खर्रा ,गुटका , बिडी सिकारेट हा त्यातीलच एक प्रकार आहे . राज्यात गुटखा बंदी असल्यामुळे  खर्रा ला खूप डिमांड आहे . पांढरी सुपारी ,सुगंधित तंबाखू  याला चुना मिसळून एका प्लास्टिक मध्ये घासून घासून तयार केलेले सुपारी व तंबाखू चे मिश्रण म्हणजे खर्रा  होय . खरा बनवण्यासाठी अनेक प्रकारचे साधने  मिळत असून मोठ्या दुकानात विद्युत वर चालणारे यंत्र पाहायला मिळतात .

  10 वर्षाच्या मुलापासून  वयोवृद्ध स्त्री-पुरुषांना खऱ्या चे व्यसन जळले . लहान मोठ्या गावात खर्रा  सर्रास मिळत असून  एका   खर्रा पुडी साठी 30रुपये  मोजावे लागतात . एका व्यक्तीला किमान दिवसातून तीन खर्रा पुडी लागत असून दिवसाला जवळपास 100 रुपये मोजावे लागतात .  सुशिक्षित नोकरदार वर्गापासून मजुरी करणाऱ्या व्यक्ती ला सुद्धा  खऱ्याची व्यसन जडलेले पाहायला मिळतात .


           तंबाखू मध्ये निकोटीन नावाचा विषारी पदार्थ असून  तो माणसाच्या शरीराला घातक आहे.सुपारी व तंबाखूच्या सेवनाने दात संपूर्ण खराब झाले असून कडक पदार्थ चावणे कठीण झाले आहे तर  अनेकांचे तोंड उघडत नाही . तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याचे चान्सेस बळावते आहे .यात जबड्याचा , ओठाचा ‘ घशाचा ,फुफ्फुसा मूत्राशयाचा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे .छाती दुखणे हृदयविकाराचा झटका ,रक्त वाहण्याची त्रासअसे आजार होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय तज्ञाकडून सांगण्यात येत आहे .


            एकीकडे शासनाला महसूल प्राप्त होत असला तरी तरुणाई मात्र  सुगंधित तंबाखू सेवनाच्या आली गेली दिसत असून  तरुण वयातच अनेक आजारांनी ग्रासलेले दिसून येते .शासनाचे नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे सुगंधित तंबाखू चे विक्री होत असताना  कार्यवाहीचे प्रमाण नगण्य दिसून येते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here