जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साधला मार्की बु. येथिल शेतकऱ्यांशी संवाद

0
55

संत्रा फळबाग शेतीची  केली पाहणी

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी तालुक्यातील बुधवार दिनांक20/04/2022
रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे  यांनी झरी तालूक्याचा दौरा केला ग्रामीण रूग्णालय झरी आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले .  त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या शेतात  जावून प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्याशी संवाद साधला .
दूर्गापूर  प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत वसुमते  यांच्या रोपवाटिकेला भेट दिली व त्यानंतर सालेभट्टी येथिल विनाताई  हायटेक नर्सरीग ला ऐच्छिक भेट दिली .

  त्या नंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंर्तगत लागवड केलेल्या संत्रा फळबाग पिकांची पाहणी करण्यासाठी  मार्की बु . येथिल शेतकरी शालीकराव  बांदूरकर यांच्या शेतात जावून संत्रा बागेची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. 
  तालुक्यातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा गाव म्हणून ओळख असलेल्या  मार्की  येथील नऊ शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प अंतर्गत  फळबाग लागवड केली आहे.  शालीकराव    बांदुरकर  ,हरिभाऊ भोंगडे , महादेव पारखी , योगराज भोंगळे , प्रमोद बदखल , संदिप येडमे , बेबीताई  येडमे इ . शेतकऱ्यांनी शेतात एक हेक्टर संत्रा फळ बागेची लागवड करण्यात आली आहे. व हरिदास पिंपळकर या शेतकऱ्यांनी एक हेक्‍टर आंबा फळबाग लागवड केली आहे  केली आहे . 
      मा. जिल्हाधिकारी यांनी शेतातच शेतकऱ्याशी चर्चा केली . गावातील सर्वच शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे . शेडनेट , रेशीम उद्योग , कुकूटपालन शेळी पालन करण्याचे  आवाहन केले .

यावेळी   लोडशेडींग बाबत, शेतकऱ्यांना रात्रीची विज न देता दिवसा घावी , खडकडोह व झरी हे दोन राजस्व मंडळ आतिवृष्टी मदत वगळले इत्यादी समस्या सांगितल्या .
    सदर क्षेत्रिय भेटीला नवनाथ कोळपकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ  जे.आर. राठोड . उपविभागीय कृषी अधिकारी, पांढरकवडा  , आनंद बदखल ,तालुका कृषी अधिकारी झरी  ,मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्येंवक्षक, कृषी सहायक  राजू कुडमेथे  समूह  सहायक व  सरपंच मारोती येडमे , अनिल पाटील विधाते , जिवन उलमाले  आणि  गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here