कुंभा येथील युवकाची गळफास घेवुन आत्महत्या

0
37

कुंभा येथील घटणा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सूरूच असताना आज 4  वाजताच्या सुमारास कुंभा येथील मारोती जगन कोकुडे, वय सुमारे 29 वर्ष यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आज दिनांक 21एप्रिल 2022 रोज गुरुवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली.

मारोती जगन कोकुडे, वय सुमारे 29 वर्ष, रा. कुंभा असे मृताचे नाव असून हा कुंभा येथे राहायचा आणि रोज मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा गुरुवरला 4 वाजताच्या सुमारास मारोती याने स्वताच्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आईच्या लक्षात येताच घटना उघडकीस आली त्यांची आई सामायन घेण्यासाठी गावातील दुकानात गेली होती ती घरी परत येताच मुलाने आत्महत्या केल्याचे तिच्या लक्षात येताच घटना उघडकीस आली.

मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व  त्या नंतर त्याला उतरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
मारोती यांच्या मागे  आई, अंध वडील , एक भाऊ, असा आप्त परिवार आहे. बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे..

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here