मोजणीचे कामे खोळंबली , जनतेच्या कार्यालयात हेलपाट्या
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी येथिल भूमि अभिलेख कार्यालयात अनेक कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्याचा परिणाम काम काळजावर झालेला असून जनतेची कामे वेळवर होत नसल्याची ओरडत होत आहे. एकूण १७ पदे मंजूर असून ८ कर्मचारी कार्यरत आहेत परंतु त्यातही एक निलंबित तर एक प्रतिनियुक्ती वर अकोला येथे काम करत आहे .
उपविभाग अधिक्षिक हे पद रिक्त असून नि . सु . भोकरे मुख्यालय साहाय्यक यांच्या कडे उप विभाग अधिक्षक यांचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे . वर्ग चारचे ५ पदे तर वर्ग ३ चे ४ पदे रिक्त असून एक पद निलंबित आहे. शिरस्तेदार पद रिक्त आहे . पाच वर्षांपासून झरी भूकरमापक अकोला येथे प्रतिनियुक्तीवर असून एकस्तर पगार अकोला येथे काम करून उचलत आहे .
भूमी अभीलेख कार्यालयातूनच शेत जमिनीच्या मोजणी, जमिनीचे नकाशे, भूमीसंपादनाची मोजणी न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकारण करणे न्यायालयाचा आदेशा नुसार जमिनीच्या मोजणी खरेदी विक्री वारसा वाटणी नोंदी व त्या संदर्भातील दाखले नमुने देण्याचे काम केले जाते.
या कार्यालयात स्थापने पासून शेकडो नोंदी आता हजारोंच्या घरात पोहोचल्या आहेत.
त्या प्रलंबित नोंदीच्या रेकॉर्ड सध्या धुळखात पडले आहेत. जमिनीच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाची पायरी चढावी लागते पण एका कामासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागतात. अकराशे च्या वर मोजणीचे अर्ज आज रोजी प्रलंबित आहेत . सध्या एक कर्मचारी एक महिना रजेवर गेल्याने नविन अर्ज स्वीकारण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यक्ती या कार्यालयात नाही .


