पिंपळखुटी (पाटण बोरी) आर टी ओ तपासणी नाका पार करण्याकरिता ट्रक ड्रायव्हर ला द्यावे लागते 500ते 1000 रुपये

0
66

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

मा.मुख्यमंत्री  व जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार.
पाटणबोरी:—-यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या पिंपलखुटी पाटणबोरी आर. टी. ओ. चेक पोस्ट तपासणी नाक्यावर गेल्या अनेक वर्षापासून तपासणीच्या नावावर ट्रक चालक व मालक कडून पाचशे ते हजारो रुपयाची वसुली करत असल्याची माहिती ट्रक ड्रायवर कडून माहिती समोर आली आहे.

येथील  परिवहन विभागाचे अधिकारी यांनी 30 ते चाळीस A D C एजेंट ला आरटीओ तपासणी नाक्यावर बसवून लहान हिरवी म्याट ची रूम तयार करून त्यांना ट्रक ड्रायव्हर कडून जबरदस्तीने पैसे मागणी करत असल्याची धाकदायक माहिती समोर आली आहे.परंतु चालू असलेल्या अवैध वसुली कडे प्रशासनच व राजकीय लोकांचं दुर्लक्ष होत आहे.परिवहन विभागाच्या R .T.O .सीमा तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यांना चिरी मिरी दिल्याशिवाय वाहने राज्याची सीमा ओलांडून जावू शकत नाही.

पैसे नाही दिल्यास एजेंट मारतात अशी माहिती एका ट्रक ड्रायव्हर ने माहिती सांगितली आहे. दररोज लाखोंच्या संख्येने वाहने जात असल्याने रोजची वसुली अंदाजे  दहा लाख च्या आसपास होत असल्याची माहीत समोर  येत आहे ,असे समजते. येथील अधिकारी व एजेंट मालामाल झाले आहे. पिंपळखुटी येथील आरटीओ परिवहन अधिकारी व एजेंट ची चौकशी  केल्यास मोठा घबाळ बाहेर येऊ शकते.

पिंपलखुटी आरटीओ तपासणी नाक्यावर परिवहन अधिकारी व एजेंट कडून दररोज ट्रक ड्रायव्हर कडून होणारी अवैध वसुली व एजेंट ला बंद  करण्याकरिता येथील माजी सरपंच विनोद निंमलवार यांनी ठाणेदार साहेब,जिल्हाधिकारी ,साहेब, एस पी,साहेब परिवहन अधिकारी यवतमाळ ,परिवहन अधिकारी अमरावती.यांना निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने या तक्रार ची दखल न घेतल्याने  मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.यांना निवेदन दिले आहे.काहीच कार्यवाही होत नसल्याने 25/4/2022.रोजी आरटीओ तपासणी नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here