वणी येथील पत्रकारांवरील हल्ल्यांचा विविध पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध….

0
61

वणी प्रतिनिधी:-

सध्याच्या काळात पत्रकारांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. अशीच घटना वणीत सुद्धा घडली आहे. एका पक्षाचा माजी तालुका प्रमुखाने झुंडीने येऊन विरोधात बातमी का लावली म्हणून हॉकी स्टिकने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेचा वणीतील विविध पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत 2019 च्या शासकीय अद्यादेश भाग चार नुसार कारवाई करावी आणि या घटनेचा जाहीर निषेध केला आहे.

सध्याच्या काळात शासनाच्या गौण खनिज संपत्तीची चोरटी वाहतूक सुरू आहे. या तस्करीला स्थानिक नेते आणि प्रशासनाचे जणू पाठबळ आहे. यासंबंधी नमो महाराष्ट्र चे पत्रकार रवी ढुमणे यांच्यावर जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेचा वणीतील सर्वच पत्रकार संघटनाही निषेध करीत राज्य शासनाचा अद्यादेश 19 एप्रिल 2019 क्र 29 व जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावे. आणि अशा गौण खनिज चोरट्यांचा मुसक्या आवळून पत्रकारांना संरक्षण द्यावे.

अशा आशयाचे निवेदन वणी शहरातील सर्वच संघटनांचे पत्रकार जब्बार चिनी,राजू धावंजेवार, मो मुस्ताक, राजू तुरणकार,रमेश तांबे, सागर मुने,विवेक तोटेवार, प्रशांत चंदनखेडे, अजय कंडेवार, रामकृष्ण वैद्य, श्रीकांत किटकुले, राजू गव्हाणे,सूरज चाटे,पुरुषोत्तम नवघरे, सुरेंद्र इखारे, रवी ढुमणे सह आदी पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.

‘””   पत्रकार संरक्षण कायदा ?
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा 2019 मध्ये अस्तिवास आला. या कायध्यानुसार पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकरांवरील
हल्ला हा आता आजामिनपात्र गुन्हा ठरलेला असुन पत्रकारांवरील हल्ल्यांची  चौकशी डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करणार आहे.,,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here