*उपविभागीय अभियंता वणी व गटविकास अधिकारी झरीजामणी यांना निवेदन*
*येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन व तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा*
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील मांडवी या गावातील खनिज विकास निधीअंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडले असून उन्हाळा संपत येत असून अजून पर्यंत येथील जनतेला लाखो रुपयाच्या कामातील पाणीपुरवठा शुद्ध पाणी मिळाले नाही ,येथील ठेकेदारांना व पाणीपुरवठा अभियंत्याला अनेकदा फोन करून सुद्धा काम अर्धवट अवस्थेत आहे. आणि उन्हाळ्याचे दिवस असून येथील जनतेला पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे.
पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, अशातच येथील विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हा संपर्कप्रमुख संदीप सुरपाम यांनी उपविभागीय अभियंता वनी व गटविकास अधिकारी झरीजामणी यांना दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी निवेदन दिले व या निवेदनात सदर येथील पेसा कायद्यातील दुर्गम भागातील मांडवी या गावी 73 लाख रुपयाच्या खनिज विकास निधीअंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहेत.
व अनेकदा वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करून सुद्धा झोपी असलेले प्रशासनाला जागी करण्यासाठी मांडवी येथील विद्यार्थी बीरसा ब्रिगेड जिल्हा संपर्कप्रमुख या रखडलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सरसावले या कामाला येत्या आठ दिवसात सुरुवात न झाल्यास विद्यार्थी बीरसा ब्रिगेड जिल्हा संपर्कप्रमुख तीव्र आंदोलन तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संदीप सुरपाम व पियुष मेश्राम यांनी निवेदनातून दिला आहे.


