बसस्थानक प्रश्नांकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष
तर तालुक्यातील प्रवाशी नि वाऱ्यांची दुरावस्था
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी :- प्रवाशांना बसच्या प्रतीक्षा करतांना उन्ह ,वारा पाऊस या पासुन संरक्षण करण्यासाठी प्रवासी निवाऱ्यांची गरज असते.त्यासाठी शासनाकडून प्रत्येक मार्गावर प्रवासी निवारे उभारण्यात आले. पण झरी सारख्या तालुक्याच्या गावाला प्रवासी निवारा नसल्याने प्रवशाची मोठी गैरसोय होतांना दिसते आहे.झरीला शाळा , महाविद्यालय , आयटीआय , ग्रामीण रुग्णालय , न्यायालयात , बँका ‘ पंचायत समिती , तहशील कार्यालय आहे.
विद्यार्थी व शासकिय कामा निमित्ताने दररोज हजारो लोक येत जात असतात .परंतु प्रवाशांना हक्काच ठिकाणं नसल्याने दुकानाचे शेड , टपरीच्या आदेशात उभे राहावे लागते आहे. विशेषतः महिला व विद्यार्थिनीची मोठी गैरसोय होत आहे.तालुक्याची निर्मिती होवून जवळ जवळ तीस वर्षे होत असले तरी मात्र तालुक्याच्या ठिकाणी प्रवासी निवारा ची सुविधा मिळत नसल्याने लोक प्रतिनिधी बद्दल रोश व्यक्त करतांना दिसत आहे.
दुसरीकडे काही गावात व गावाकडे जाणार्या थांब्यावर प्रवासी निवारे व पाण्यासाठी हॅन्ड पंप ची सुविधा करण्यात आली होती परंतु अल्पावधीतच आता काही प्रवासी निवारे अखरेची घटका मोजत आहे.प्रवाशांना बसायचा ओठा फुटलेला व फ्लोरीग निघाली असून रंगाचा बेरंग झालेला दिसून येतो.तर काही निवाऱ्यांवर व्यवसायीकांनी आतिक्रमण केलेले दिसून येते.
घोन्सा – शिबला रोडवरील दरारा येथिल निवाऱ्या गावातील समोर सांडपाणी साचून चिखल झाला आहे.तर काही नको त्या ठिकाणी बांधकाम करून निधीचा अपव्यय केल्याचे दिसून येते आहे.लोकांची गरज लक्षात घेता झरीला शक्य तितक्या लवकर प्रवासी निवारा व तालुक्यातील निवार्याची दुरुस्ती घेण्याची मागणी जनते कडून करण्यात येत आहे .


