वणी : येथील पत्रकार जितेंद्र कोठारी यांचे सुपुत्र रौनक कोठारी यांना नुकतेच फिजिओथेरपिस्ट पदवी बहाल करण्यात आली. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे शुक्रवार 27 मे रोजी आयोजित पदवीग्रहण समारंभात रौनक कोठारी याना डॉक्टरच्या पदवीने गौरविण्यात आले.
वणी येथील स्वर्णलीला इंटरनेशनल शाळेत 12 वी पर्यंत शिक्षण घेऊन डॉ. रौनक यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण केली. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या कॉलेज मध्ये 4 वर्षाचे अभ्यासक्रम व 6 महिन्याचे इंटर्नशिप कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांना BPTH डिग्री मिळाली आहे.

डॉ. रौनक कोठारी आपले यशाचे श्रेय आपले आई, वडील, बहीण, परिजन, स्वर्णलीला शाळेचे प्रिन्सिपल व शिक्षक तसेच डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी जळगाव येथील शिक्षकांना दिले आहे.


