ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

कळमनुरीत पूर्ववैमनस्यातून 23 वर्षीय तरुणाचा डोक्यात दगड घालून खून:6 जणांवर गुन्हा, पोलिसांकडून 24 तासांत चौघांना बेड्या!

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कळमनुरी शहरात जून्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी ता. 24 पहाटे सहा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने चौघांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी ये्तील पाटील गल्ली भागातील रहिवासी असलेला नवनाथ शिवाजी बेद्रे (23) याचा काही मित्रांसोबत वाद झाला होता. यावादातून एकमेकांविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या होत्या. त्यानंतरही त्यांच्यात कुरबुरी होतच होत्या. दरम्यान, शनिवारी ता. 23 सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवनाथ याच्या मित्राने त्याला बोलावून नेले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह साईनगर भागातील एका ठिकाणी असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष इंगळे, जमादार रवी इंगोले, गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मयत नवनाथ याच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे दिसून आले. या प्रकरणी शिवाजी बेद्रे यांनी आज पहाटे कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अमर शिंदे, परमेश्‍वर उर्फ बंटी जाधव, भारत यादव, दुर्गेश गाभणे, आकाश सातव, सुरेश सातव (रा. कळमनुरी) यांच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, उपाधीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली होती. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने अमर शिंदे, परमेश्‍वर उर्फ बंटी जाधव, दुर्गेश गाभणे, सुरेश सातव यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरु केली असून या खूनामध्ये आणकी काही कारण आहे काय याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. या शिवाय उर्वरीत दोन आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात आली आहे. या घटनेमुळे कळमनुरी शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर