ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

उन्हाळ्यात कोपरगावच्या शेतीला अन् गावाला “निळवंडे’च्या पाण्याने दिलासा:सर्व तलाव, साठवण बंधारे भरू द्या, आमदार काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बहुप्रतीक्षित निळवंडे कालव्यांचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव शाखा कालव्यातून वडझरी पॉईंट, बोडखेवाडी पॉईंट आणि शेख वस्ती पॉईंटमधून सध्या पाणी सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे तालुक्यातील जिरायती भागातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. निळवंडेचे हे पाणी आता अंजनापूर गावापर्यंत पोहोचले असून, वडझिर पॉईंटमधून डांगेवाडी बंधाऱ्यात पाणी सोडणे सुरू आहे. हे पाणी पुढे वेस, सोयगाव, आणि बहादराबादपर्यंत पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर, चालू आवर्तनातून कोपरगाव मतदारसंघातील सर्व पाझर तलाव, बंधारे आणि गावतळे पूर्ण क्षमतेने भरून देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला द्याव्यात, अशी आग्रही मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची टंचाई व मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींबरोबरच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे देखील दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते. या बैठकीत आमदार काळे यांनी कोपरगावच्या पाणी प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. चालू वर्षी उन्हाची तीव्रता अत्यंत भीषण आहे. सुदैवाने गोदावरी कालव्यांचे आणि निळवंडेचे आवर्तन सुरू असल्यामुळे सध्या तरी कोपरगावमध्ये पाण्याचे मोठे संकट जाणवलेले नाही. जिरायती भागातील नागरिकांना या निळवंडे आवर्तनाचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामान विभागाने चालू वर्षी पर्जन्यमान कमी राहण्याचा किंवा पाऊस लांबण्याचा अंदाज वर्तवला आहे. आमदार काळे यांनी पुढे स्पष्ट केले की, पाऊस सुरू होण्यास अजून अवधी असल्यामुळे, जर निळवंडेच्या याच सुरू असलेल्या आवर्तनातून जिरायती भागातील सर्व पाझर तलाव, बंधारे व गावतळे भरून घेतले, तर पाऊस पडेपर्यंत नागरिकांना व जनावरांना पाण्याचा कोणताही तुटवडा भासणार नाही. पालकमंत्र्यांचा प्रतिसाद, नागरिकांकडून आभार आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या या मागणीला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला . पाटबंधारे विभागाला तशा सूचना देण्याचे मान्य केले. यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टळणार असल्याने कोपरगाव मतदारसंघाच्या जिरायती भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे विशेष आभार मानले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर