ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

तो नेहमीचा भारदस्त आवाज ऐकू आला नाही:अजित पवारांच्या आठवणीत पवार कुटुंबीय भावूक; सुप्रियांसह जय – रोहित पवार दुःखात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज 1 महिना पूर्ण झाला. पण पवार कुटुंबीयांसह अख्खा महाराष्ट्र अजूनही त्यातून बाहेर पडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एका पोस्टद्वारे अजित पवारांच्या आठवणी जागवल्या. तर आमदार रोहित पवार यांनी एक स्क्रिनशॉट शेअर करत महिन्याभरापूर्वी घडलेली घटना झोपेत पडलेले एक वाईट स्वप्न होते अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनीही आपल्या वडिलांचे काही फोटो पोस्ट करत त्यांची आठवण काढली आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत आहेत. आज अजित पवारांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झाला असताना त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी आज त्यांचे काही फोटो शेअर करत आपल्या वडिलांची आठवण काढली आहे. या फोटोत लहानगे जय पवार अजित पवारांच्या खांद्यावर बसल्याचे दिसून येत आहे. ‘मीस यू डॅड’ असे कॅप्शन जय यांनी या फोटोला दिले आहे. अजितदादा सोबत नाही हे पचवणे अवघड खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भावाची आठवण काढत दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल अशी भावना व्यक्त केली आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील. Miss you Dada. त्या काळ्या दिवशी कॉल केला, पण… रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे अजित पवारांना 28 जानेवारी रोजी सकाळी 8.56 वा. केलेल्या एका फोनचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही. खूप वेदनादायी..! विमान अपघाताचा आज प्राथमिक अहवाल येणार दुसरीकडे, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता आहे. त्यात हा अपघात नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या अहवालातील निष्कर्ष पाहून सोमवारी एका पत्रकार परिषदेद्वारे अजित पवारांच्या अपघाताविषयी काही नवे पुरावे व माहिती जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी या प्रकरणी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले. हे ही वाचा… अजित पवारांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण:युगेंद्र पवारांचे काकांना पत्र; म्हणाले, आजी अन् बाबांचे अश्रू थांबेनात, तुम्ही पोरके करून गेलात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज बरोबर 1 महिना पूर्ण झाला. पण आजही पवार कुटुंबीयच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्या आठवणीने व्याकुळ होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तथा अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज आपले काका अजित पवारांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात त्यांनी आजी आणि आपल्या बाबांच्या डोळ्यातून आजही तुमच्या आठवणीने अश्रू ओघळतात अशी भावना व्यक्त केली आहे. तसेच तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून गेल्याची भावनाही व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर