ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

झाडूपोछा करणारे जरांगेंचे उंबरठे झिजवत आहेत:लक्ष्मण हाकेंचा प्रसाद लाड यांच्यावर हल्ला; फडणवीसांवर तोंडाला पाने पुसल्याचा आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीच्या आंदोलनासमोर हे सरकार पूर्णपणे झुकले असून, त्यांच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. या लोकनियुक्त सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. लक्ष्मण हाके म्हणाले की, राज्यातील लोकसंख्येचा विचार करता ओबीसी समाजाला अर्थसंकल्पात 50 टक्के निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या तोंडाला पाने पुसत 1 टक्क्यापेक्षाही कमी निधी दिला. सरकारने केवळ निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने अनेक महामंडळांची घोषणा केली. पण आज या महामंडळांना ना निधी मिळाला आहे, ना हक्काचा सचिव. हा केवळ निवडणुकीचा जुमला होता का? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. जरांगे कुठल्या सभागृहाचे लोकप्रतिनिधी? लक्ष्मण हाके म्हणाले की, प्रसाद लाड नावाचा आमदार म्हणतो की ‘हत्ती अख्खा गेला आणि आता फक्त शेपूट राहिले आहे. लाड यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग बोलावे. हॉटेलवाले, झाडूपोच्छा करणारी टीनपाठ माणसे जरांगेचे उंबरठे झिजवत आहेत. लाड यांच्यासारख्या नेत्याला जरांगेंकडे पाठवून सरकारने स्वतःचाच ‘सेल्फ गोल’ केला आहे. माझी पात्रता विचारणाऱ्या लाड यांनी आधी सांगावे की मनोज जरांगे कुठल्या सभागृहाचे लोकप्रतिनिधी आहेत? असा थेट सवाल त्यांनी केला. आमचा हक्काचा निधी डावलला जातोय लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्ही यापूर्वीच राजेश टोपे यांना थेट आव्हान दिले होते, आज त्यांना स्वतःच्या मतदारसंघात एक सरपंचही निवडून आणता आलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला. सातसमुद्रापारून आलेल्या इंग्रजांनी या देशात जातनिहाय जनगणना करण्याची हिंमत दाखवली, पण स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांना ती करता आली नाही. आमच्याकडे अचूक इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे ओबीसींची नेमकी संख्या मोजली जात नाही. त्यामुळेच आमचा हक्काचा निधी डावलला जात आहे. पवार कुटुंबावर टीका लक्ष्मण हाके म्हणाले की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘पवार प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी करून टाकली आहे. तर दुसरीकडे, शरद पवारांनी कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेच्या घटनेत सोयीस्कर बदल करून स्वतः अध्यक्षपद पटकावले आणि रोहित पवारांना उत्तर विभागाचे अध्यक्ष केले. भाजप सध्या ‘जेन झी’ पिढीला आणि कॉकरोज जनता पार्टीला प्रचंड घाबरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर