ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

त्यांना ताकदवर लोक नाही, गुलाम पाहिजे:संजय पाटलांची शिवसेना ठाकरे गटावर टीका; म्हणाले- एका व्यक्तीमुळे प्रॉब्लेम झाला

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण, त्यांचे नाव घेण्यास संजय पाटील यांनी टाळले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय दिना पाटील यांच्या मुलीच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्या घरात सर्वांना स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांना काय करायचे आहे ते त्यांनी ठरवायचे आहे. कुठल्या राजकीय पक्षात काम करायचे आहे त्यांनी ठरवायचे आहे. माझा पुतण्या भाजपचा कार्यकर्ता आहे. माझी सूनबाई दुसऱ्यांदा भाजपची नगरसेवक आहे. एकाच घरात राहतो, एकाच किचनमध्ये जेवतो. मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना ताकदवर लोक नकोय, गुलाम लोक पाहिजे तसेच काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली. त्यावर बोलताना संजय दिना पाटील म्हणाले, हेच जर अगोदर आले असते आणि यायची पण गरज नाही. मला आणि ज्या व्यक्तीसोबत प्रॉब्लेम होता, त्या व्यक्तीला बोलावले असते तर ही स्थितीच आली नसती. मी जर गेलो नसतो तर हा कोरमच पूर्ण झाला नसता. मला बोलवून घेतले असते, मी जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्या, तिथे येऊन माफी मागा. मी त्यांच्याबरोबर मातोश्रीला गेलो असतो. पण त्यांना आम्ही नकोय. त्यांना ताकदवर लोक नकोय, गुलाम लोक पाहिजे. पण मला उद्धव साहेबांसोबत, आदित्य ठाकरेंसोबत, त्यांच्या कुटुंबासोबत काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वांनी मला मानसन्मान दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना दिला आहे. स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले पुढे बोलताना संजय दिना पाटील म्हणाले, मला जर कोणी एक रुपया दिला तर मी त्यांचे 100 करून देतो. एवढे केले आहे. एका व्यक्तीने फक्त केले आहे. तोंडावर गोड बोलायचं आणि माझ्या सगळ्या लोकांना शिव्या द्यायच्या. किती सहन करणार शिव्या? स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले. बोलून थकलो, सगळे नेते मंडळी देखील त्यांना सांगून थकले. संजय राऊत साहेबांचे माझ्यावर उपकार संजय राऊत यांच्यावर तुमचा रोख आहे का? असा प्रश्न विचारला असता संजय दिना पाटील म्हणाले, संजय राऊत साहेब नेहमी मला चांगले बोलले आहेत. मला मानसन्मान दिला. मला देखील त्यांचा खूप मानसन्मान आहे. मला आमदार करण्यात त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. त्यानंतर 2009 मध्ये खासदार होण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली. ते मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात. मला त्यांच्याबद्दल बोलायचे नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर