पावसाचा अंदाज नाही मात्र धुळ पेरणी जोमात

0
49

अनेक शेतकरी पिक कर्जाच्या प्रतिक्षेत
बियाणे व खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- ८ जुन पासून सुर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला आहे .रोहिणी नक्षत्रात कुठेच चांगला पासून पडल नाही  . पावसाचा काहीच अंदाज दिसत नसला तरी अनेक   शेतकऱ्यांनी कपासीची व तुरीची धूळ पेरणी करयाला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. बळीराजा खरिप हंगामाच्या तयारीला लागला आहे.मशागत करून जमिन पेरणी करता सज्ज  करण्यात आली आहे.

बियाणे खत खरेदीची लगबग सुरू झाली आहे.पावसाळा तोंडावर आला असला तरी बऱ्याच बॅकांनी पिककर्ज  वाटप केले नाही . तर जिल्हा बँका चा सहकारी संस्थाच्या निवडणूकीमुळे पिककर्ज वाटपला उशीर होत आहे .  यंदा बियाणे महागले व खतांच्या कीमती दीडपटीने वाढल्या  असून खर्चाचा ताळमेळ बसवितांना दमझाक होत आहे .
झरी तालुक्यात  सर्वधारण क्षेत्र ४२१९० हेक्टर आहे. खरिप हंगाम  २०२२ – २३ करिता कापूस   क्षेत्र २७१५० हेक्टर असून १३५७५० पाकीट बियाणे आवश्यकता आहे.

सोयाबीन क्षेत्र ४४९० हेक्टर राहणार असून ६३६७ क्विंटल सोबीन बियाणाची गरज आहे.कापूस व सोयाबीन मध्ये अंतर्गत पीक म्हणून तुरीची पेरणी केली जाते.तुरीचे संभाव्य लागवड क्षेत्र५९७४  हेक्टर क्षेत्रावर होणार असून २५८  क्विंटल बियाणाची गरज भासणार आहे.त्या बरोबर  मुंग क्षेत्र ६५ हेक्टर साठी १० . ८५ क्विटल तर ज्वारी  क्षेत्र १२७ हेक्टर साठी १९ क्विंटल बियाण्याची गरज भासणार असल्याचे तालूका कृषी अधिकारी यांचे कडून  सांगण्यातआले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here