युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी केली होती मागणी.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी.
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम झरी तालुक्यातील अडेगाव येथे गौनखनिज खदानी मोठ्या प्रमाणात आहे याचं अडेगाव गावातून शासनाला मोठा खनिज निधी सुद्धा उपलब्ध होतो पण गौणखनिज व्यापलेले गावात खनिजचा निधी खर्च केल्या जात नव्हता.हाच मुद्दा घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपाम भुमरे व जिल्हाधिकारी यांच्याकडे अडेगाव विकासाठी खनिज निधी उपलब्ध करून देण्याबाबत युवा नेते मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी वारंवार मागणी लाहून धरली.

अखेर खनिज विकास निधी अंतर्गत पालकमंत्री संदिपाम भुमरे यांनी अडेगाव विकासासाठी 35 लक्ष रुपये मंजुरात केली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. यात भव्य 20 लक्ष रुपयाचे वाचनालय सोबत 10 लक्ष रुपयांचे प्रीतम लोढा ते किशोर काटकर यांच्या घरापरेनत सिमेंट रोड व 5 लक्ष रुपयाचे जिल्हा परिषद शाळा अडेगाव साठी भीत बांधण्यात येणार असल्याचे सरपंच सीमा लालसरे यांनी सांगतीले.

या पूर्वी सुद्धा पालकमंत्री संदिपमा भुमरे यांनी अडेगाव खडकी रस्त्या साठी 3 कोटी 32 लक्ष मंजुरात दिली होती.सोबतच गावातील मातोश्री पांदण रस्ते सुद्धा मंजूर केले होते. युवा नेते मंगेश पाचभाई वारंवार पत्र व्यवर करून मागणी लाहून धरत असतात व परिसरातील समस्या चे निवारण करत असतात हे विशेष.