तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जमणी परिसरात काल सायंकाळी
सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला असला तरी या पावसामुळे अनेकांच्या घरावरील टिन पत्रे उडाली आहे .शेतातील शेळ उडून गेल्याने शेतातील रासायनिक खत व जनावरांचा चारा पावसाने भिजला गेला आहे.या वादळी वाऱ्यामुळे मोठ मोठी झाडे कोसळली असून रस्त्यावर कोसळलेल्या झाडांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

मार्की खु. येथिल जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेला ५० फुटाचा बि एस एन एल चा खांब बुडापासून कोसळला गेला वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळले आहेत परिणामी २४ तास होवूनही विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू झालेला नव्हता पाणी पुरवठा बंद झाल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे मात्र या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कपासीच्या टोबण्याला वेग आला आहे .


