अभिकर्त्यांच्या न्यायहक्कासाठी असोसिएशन एकवटली.

0
76

अध्यक्षपदी सागर बोढे तर सचिव अविनाश कडू कार्यकारणी गठीत.

वणी (तालुका प्रतिनिधी)

वणी शहरात पतसंस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. दैनिक बचत अभिकर्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अभिकर्ते पतसंस्थेच्या हिताकरिता कर्तव्य बजावतात. त्या सर्व अभिकर्त्यांना स्वतःच्या न्यायहक्कसाठी एकसंघ करण्याची जबाबदारी दैनिक अभिकर्ता असोसिएशनने उचलली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी सागर बोढे तर सचिव म्हणून अविनाश कडू यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

दैनिक अभिकर्ता असोसिएशनच्या कार्यकारणी मध्ये उपाध्यपदी अभिकर्ता तेजराज ठाकरे, प्रमोद शिवरात्रीवर, कोषाध्यक्षपदी महेंद्र टिकणायत, सहसचिव शेख शपाद, तर कार्यकारणी सदस्य म्हणून दिलीप दरवरे, भास्कर बोदाडकर,भारत लिपटे, अशोक हेपट, योगेश गोवरदीपे, तर राजेश माळीकर, नरेंद्र सपाट, मोहन हेपट, साहिर पठाण, कैलास पचारे, विनोद महाजनवार, प्रफुल बांगळे, फिरोज खान, गजानन बत्तूलवार, जितेंद्र पाऊनकार, रुपेश कुचेरीया, विजय पिंगे, कपिल भारवानी, अशोक अंकतवार, भूषण पारवे, अतुल वाटेकर, श्रीतेश दुरुतकर, चंदन वाघमारे, अजय चिंचोलकर, हनिफ शेख, रितीक शिवणीतवार,

या अभिकर्त्यांचा सदस्य म्हणून असोसिएशनमध्ये समावेश आहे. दैनिक अभिकर्ता असोसिएशन स्थापनेच्यामागे विविध उद्देशांचा समावेश आहे. प्रामुख्याने संस्थेच्या हिताकरिता सदैव खस्ता खाणारे अभिकर्ते यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा कवच पुरविण्यात येत नाही. संस्थेने त्यांचा अपघात तसेच आरोग्य विमा काढणे गरजेचे आहे. भविष्य निर्वाह निधी बाबतही संस्थेने सकारात्मक असणे गरजेचे आहे. अभिकर्त्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प आहे.

अशा विविध समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न असोसिएशन करणार आहे.दैनिक अभिकर्ता असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, अभिकर्त्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याकरीता विविध उपक्रम असोसिएशनच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

Previous articleबळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा.
Next articleवादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी.
सुरेश पाचभाई
मुख्य संपादक Phone: 9922862184 SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या, सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा, कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित जनते पर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे. " घडावा देश, हाची उद्देश , ....... आवाज जनतेचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here