श्री.रंगनाथ स्वामी पतसंस्था निवडणूक चुरशीची होणार,,,

0
166

परिसरातील मतदात्यांचा परिवर्तन पॅनलच्या दिशेने मदारांचा कौल.

वणी :- तालुका प्रतिनिधी.

वणी तालुक्यातील सहकार क्षेत्रात वणीचे आराध्य दैवत श्री रंगनाथस्वामी यांच्या नावावर असलेली श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची होऊ घातलेली निवडणूक अतिशय चुरशीची मानली जाते त्यातच दोन गटात निवडणूक होत असल्याने दोन्ही पॅनल आपापल्या ताकतीनिशी निवडणुकीच्या रणांगणात उतरले असुन नेमका कोणाचा पगडा भारी होणार हे मतदार राजा वेळेतच काळविणार असून मात्र सज्जड अनुभवासह परिवर्तन पॅनल चे उमेदवार श्री रंगनाथस्वामीच्या रिंगणात उतरले असून मतदारांचा कौल सुद्धा त्यांच्या दिशेने सक्रिय असल्याचे चित्रं दिसत आहे.

एका लहान वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर झालेल्या तालुक्यात जिल्ह्यात नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक 26 जुन 2022 रोजी होवू घातली आहे या निवडणुकीत परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनल समोरा-  समोर असून निवडणूक अटीतटीने रंगतदार रंगणार आहे पतसंस्थेची निवडणूक वणी तालुक्यांतील जनतेसाठी पतसंस्थेच्या सभासदांसाठी तसेच परिसराच्या विकासासाठी अतिशय महत्वाची असून पतसंस्थेत बदल घडविण्यासाठी परिवर्तनीय खेळी करीत सहकार पॅनल ला धोबी पछाड देण्याच्या तयारीत आहे,

मोठ्या प्रमाणात मतदार राज्याचा कौल परिवर्तनाच्या दिशेने असल्याने निवडणुकीत अटीतटीची भूमिका होणार असल्याचे दिसते आहे.
ही निवडणुक 17 संचालकांची असून एकुण 18 मतदान केंद्रावर निवडणूक पार पडणार आहे तर निवडणुकीत सहकार पॅनलपेक्षा वणी शहरात परिवर्तन पॅनलचे पारडे सध्यातरी जड असल्याचे दिसत आहेत.

निवडणुकीत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पतसंस्थेवर आपला अधिकार कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर परीवर्तन पॅनलला निवडणूकीत  निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्यातच दि 19 जून रोजी परिवर्तन पॅनलने प्रचाराला सूरूवात केली आहे, प्रचार रॅली शहरातील प्रमूख मार्गावरून फिरून मतदारांपर्यंत पोहचत असून मतदारांचा कौल परिवर्तन पॅनलकडे जास्त दिसून येत असुन वणी शहरात परिवर्तन पॅनलच पतसंस्थेत बदल करु शकतील ही आशा मतदार राजा दाखवीत असून मतदार परिवर्तन पॅनलला पसंती देत आहे

*परिवर्तन पॅनलचे उमेदवार खालील प्रमाणे*

जय नेमीचंद आबड, दिनकर कृष्णाजी आकनुरवार, वसंत श्रीरंग आसुटकर, शिरीष सुर्यकांत बोगावार, ॲड भास्कर नानाजी ढवस, डॉ राजेन्द्र अजाबराव ढवस, प्रा शाम माधव डोये, डॉ भाऊराव भानुदास कावडे, राम वसंतराव खांडरे, डॉ हेमंत वासुदेव खापणे, डॉ मोरेश्वर रामचंद्र पावडे, इजहार शेख ग्यासुद्दीन शेख

*महिला राखीव मतदार संघ*
सौ आरती संजय चौधरी, सौ नम्रता मेघशाम तांबेकर

*भटक्या विमुक्त जाती किंवा जमाती*
राजेंद्र पुंडलिक कोरडे

*अनुसूचित जाती जमाती*
प्रा डॉ अविनाश नामदेव घरडे

*इतर मागासवर्गीय*
आशिष आनंदराव खुळसंगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here