नळयोजनेचे काम 7 महीण्यानंतर सुध्दा अपुर्णच
ग्रामस्थ अजुनही तहाणलेलेच.
ग्रामस्थांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव : पाणी ही मुलभुत वअत्यावश्यक गरज असल्यामुळे 7 महिन्यापूर्वी नळ योजनेचे काम सुरु करण्यात आले. मात्र काम अपुर्णावस्थेत असल्याने मात्र हटवांजरी (पोड) येथील नागरीक अजुनही तहाणलेलेच असल्याने काम पुर्ण करुन पाणी पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा गट विकास अधिकारी मारेगाव यांना हटवांजरी (पोड) येथील नागरिकांनी निवेदनातुन दिला आहे.
तालुक्यातील हटवांजरी (पोड) हे आदिवासी बहुल असुन प्रत्येक गाव पोडात मुलभुत सुविधा मिळणे अपेक्षित असतांना हटवांजरी (पोड) येथे सोयी सुविधांचा अभाव असल्याचे पहावयास मिळत आहे.पाणी हे जीवन अर्थात अमृततुल्य असुन पाण्याशिवाय कुणीही जगु शकत नाही. हटवांजरी येथे सुध्दा येथील नागरीकांना पाण्याची चणचण भासु नये यासाठी सात महीन्यापुर्वीच नळ योजणेचे काम सुरु करण्यात आले मात्र अजुनही अपुर्णावस्थेत असल्याने पाणी पुरवठा होत नसुन त्यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी आजही भटकंती सुरु आहे.
ग्रामपंचायत प्रशासन पोडा कडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी निवेदतुन केला असुन येथील बंद पडलेली पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा हटवांजरी (पोड) येथील नागरिकांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.यावेळी,प्रमोद मेश्राम,दीपक आत्राम,सुनील टेकाम,मीना मेश्राम,मंदा आत्राम,माया आत्राम,कविता टेकाम,संदिप आत्राम बापुजी कुमरे, गणेश आत्राम, संतोष टेकाम, सुरेश आत्राम,यांचे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.