तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी २६ जून पासून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहे. यातच झरी तालुक्यातील शाळा सुरू झाल्या आहे.पण विध्यार्थी शाळेत जायला बस फेऱ्या उपलब्ध नसल्या मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.परगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय पाहून तालुक्यातील युवा नेते मंगेश पाचभाई यांनी अडेगाव,खातेरा,येडत,पांढरकडा लहान मार्कि,मागली,भेडाळा,कोसारा व तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना ये-जा करणाऱ्या पूर्वी प्रमाणे बस फेऱ्या सुरू करण्या करीता निवेदन दिले.

तालुक्यातील विद्यार्थ्यांना मानव विकास बस सेवा सुरू करा ,व इतर फेऱ्या सुरू करण्याकरिता आगर प्रमुखास निवेदनाद्यारे मागणी केली आहे.परिसरातील रस्ते खराब असल्यामुळे ऑटो व इतर वाहनाचा प्रवास धोकादायक असून त्या वाहणा ने प्रवास करावा लागत आहे .या साठी युवा नेते मंगेश पाचभाई यांनी वणी आगर गाठून निवेदन दिले.
व तालुक्यातील मानव विकास सोबतच विध्यार्थी फेऱ्या त्वरित सुरू करण्यांची मागणी केली या वेळी सरपंच सीमा लालसरे राहुल ठाकूर व विध्यार्थी उपस्थित होते.सोमवार पासून पुर्वी प्रमाणे बससेवा सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.नक्कीच त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याची अशा व्यक्त केली जात आहे .