मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरातील बोदाड या छोट्याशा गावातील प्रगतशील शेतकरी नंदकिशोर नागोजी खामनकर या तरुण शेतकऱ्याने गेल्या 4 वर्षा पासून फुलबाग शेतीला सुरूवात केली आहे.त्यांनी 1 ऐकर झेंडूची लागवड सतत करत आहे. तो 1 एकर फुलबाग शेती मध्ये 2 लाख रुपयाचे उत्पन्न एका वर्षाला घेत आहे.
आणि त्या सोबत अर्धा एकर कारलीची लागवड केली असुन अर्धा एकर कारलीचे 1लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे. त्या मुळे दिनांक 1 जुलै 2022 रोज शुक्रवारला कृषी दिनाच्या दिवशी कृषी विभागाच्या मारेगाव येथील कार्यक्रमामधे पंचायत समिती मारेगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गाडगे साहेब कृषी विभागाच्या वतीने आणि वाघमारे साहेब कृषी अधिकारी पंचायत समिती मारेगाव तालुका कृषी अधिकारी मारेगाव एस. एन. निकाळजे यांनी नंदकिशोर नागोजी खामनकर यांच्या सत्कार करण्यात आला आहे.



