जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे व गुरुदेव सेवकांचे न.पंचायतला साकडे.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगांव तालुका स्थळी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा नगर पंचायत मारेगांवच्या प्रांगणात पुतळा बसविण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे व गुरुदेव सेवकांकडुन नगर पंचायतला साकडे घालण्यात आले आहे.तालुक्यात ग्रामीण भागात गुरुदेव सेवा मंडळे कार्यरत असुन सामाजिक क्षेत्रात सुध्दा गुरुदेव सेवा मंडळाचे भरीव योगदान आहे.
अनेक दिवसांपासून, वंदनिय राष्ट्रसंतांचा तालुका स्थळी पुतळा असावा यासाठी गुरुदेव सेवक प्रयत्नशील असतानाच मारेगावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवक पुंडलिक साठे यांनी पुढाकार घेत स्वःखर्चाने पुतळा देण्याबाबत गुरुदेव सेवकांना आश्वासीत केले. परंतु जागेची अडचण असल्याने, नगर पंचायत प्रांगणाच्या एका बाजुला वंदनिय राष्ट्रसंतांचा पुतळा बसवु द्यावा व परवानगी द्यावी असे साकडे निवेदना द्वारे नगर पंचायतला घालण्यात आले आहे.
यावेळी मारोती गौरकार, रामभाऊ दरेकर, ठावरी गुरुजी, गंगाधर लोनसावळे महराज, सुरेश सोनटक्के, बंडु सुर, राजेंद्र मांदाडे, गारोडे , वसंत भट, देवराव सिडाम, सुरेश झोटींग, मधुकर कुळसंगे, यांचेसह गुरुदेव सेवक उपस्थित होते.


