अज्ञात ट्रकच्या धडकेत एक जण जगीच ठार .
तालुका प्रतिनिधि:- वणी
वणी तालुक्यातील:- राजूर फाट्या जवळील रिंग रोडवर काल रात्री 8 वाजताच्या सुमारास घटना. रिंग रोडवर उजव्या बाजूला असलेल्या कोलवॉशरी मधून एक वर्कर काम करून रस्ताने जात असताना, कोलवॉशरी मधून आलेल्या एका अज्ञात ट्रकने पायदळ चालत असलेल्या युवकाला चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला व त्याला सुमारे 150 मीटर अंतरापर्यंत घासत नेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या अपघाता मध्ये निंबाळा येथील युवक विपीन खंडाळकर वय सुमारे 30 वर्ष असे मृतक युवकाचे नाव असुन काल दिनांक 16 जुलै 2022 रोज शनिवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास राजूर जवळील रिंग रोडवर एका अज्ञात ट्रकने ठोस मारून चिरडले आणि पसार झाला आहे.

या घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून,गावातील जनतेसह सह सरपंच यांनी घटनस्थळा वरील मृतकाचे शरीर उचलण्यास पोलिसांना नकार दिला होता त्यामुळे घटना स्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करत आहे.


