अपूऱ्या गुरूजीमुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

0
65

शिक्षणविभागात अनेक पद रिक्त.

मार्की शाळेत ७ वर्ग शिक्षण ३  तर   अनेक शाळांची ही अवस्था.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- २६ जून पासून शाळा सुरू झाल्या परंतु ग्रामीण भागातील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविणारे शिक्षक नसल्याने त्यांचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र पहायला मिळतात.शिक्षण हा बालकाचा अधिकार आहे. त्याला सक्तीचं मोफत शिक्षण मिळालं पाहीजे.एकही विद्यार्थी शाळाबाह्या राहयला नको यासाठी प्रयत्न केले जात आहे.

त्यांना पोषण आहार,पाठ्य पुस्तक,गणवेश व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून करोडो रुपये निधी खर्च केला जातो आहे.परतु विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षकच नसल्याने आता पालकांचा कल खाजगी शाळेकडे असून .जि.प. शाळा ओस पडत आहे.परंतु झरी तालूका आदिवासी व दुर्गम आहे.गरिब,शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांची भिस्त आजही.जि.प. च्या.शाळेवर आहे .

तालुक्यात अनेक भागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.या शिक्षण विभाग अपवाद नाही.शिक्षण विभागात गट शिक्षण अधिकारी हे पद रिक्त असून प्रभारावर कारभार सुरू आहे.शालेय पोषण आहार अधिक्षक १ , शालेय विस्तार अधिकारी  ३, केंद्र प्रमुख १० , कर्लक २, शिक्षकांची ८५ पदे रिक्त आहेत.पं.स. मध्ये एकूण११६ शाळा आहे त्यासाठी ३६५ शिक्षक आवश्यक आहे.परंतु अनेक शाळेत केवळ एकच शिक्षक असल्याने ते सुटीवर असले तर शाळा बंद ठेवण्याची वेळ येते आहे.

जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक मार्की बु. शाळेत पूर्वी ७ शिक्षक असत.ही केद्र शाळा असून मार्की खु.खडकडोह , शेकापूर,आडकोली ,पवनार , पांढरकवडा ( ल . ) , अर्धवन भेंडाळा या शाळांचा  केंद्रात  समावेश आहे.मार्की ७  वर्ग  असून ११४ पटसंख्या एकूण ५ शिक्षकांची गरज आहे मात्र  शिक्षक केवळ ३ आहे. तर त्यापैकी १ शिक्षकाकडे  मुख्याध्यापक पद असून केंद्रप्रमुखाचा प्रभार देण्यात आला आहे. १ शिक्षक बि. एल.ओ.म्हणून काम करतात.हे सगळं सांभाळून ज्ञानार्जन करावे लागते आहे.

” मार्की बु. ची शाळा केंद्रीय व.प्रा.शाळा असून या शाळेला ७ वर्ग आहे.पण ११४ पटसंख्या असूनही केवळ ३ शिक्षण कार्यरत आहे.त्याच बरोबर त्यांना इतर प्रभार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यांच्या वरिल इतर कामाचा ताण कमी करावा व आणखी शिक्षक देण्यात यावे.अन्यथा पालक व ग्रामस्थ कडून आंदोलन करण्यात येईल . “
जिवन उलमाले
     अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रा.पं. सदस्य मार्की बु .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here