तहसीलदार दिपक पुंडे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन नावारुपास आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आदीवासी बहुल असलेला मारेगांव तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून कापुस उत्पादक तालुक्याची ओळख आहे.
मारेगांव तालुक्यातील शेतकरी पेरणीच्या वेळी पावसाचा लपंडाव होत होता त्यामुळे बळीराजावर दुबार, तिबार पेरणीने संकटात सापडला असल्याने कर्जबाजारी झाला आहे. पण तालुक्यात मागील १५ दिवसापासून दैनंदिन कोसळणाऱ्या पावसाच्या मुसळधार सरीने शेती क्षेत्राचे कमालीचे नुकसान झाले. शेतीला चक्क शेततळ्याचे स्वरुप आल्याने खरीपातील कापुस, तुर, सोयाबीन,मका, ज्वारी सह विविध पिकांचे कमालीचे झालेले नुकसान भरुन न निघनारे असल्याने जगाचा पोशिंदा कर्जबाजारी व हवालदील झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने यांची गंभीर दखल घेवुन तात्काळ मारेगांव तालुक्यातील अतीवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी ५० हजार रुपये आर्थीक मदत जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष नबी शेख यांनी केले. ता.२१ला मारेगाव येथील तहसिलदार दीपक पुंडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदन देतांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे , शहर अध्यक्ष शेख नबी , चांद बहादे , समीर सय्यद,आकाश खामनकर,गौरव कोवे,रवी चौधरी ,सौरभ सोयाम,इब्राहिम शेख ,बबलू विरुटकर यांचे सह म.न.से.कार्यकर्ते उपस्थिती होते.