पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – युवा कॉग्रेस ची मागणी.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी :- जुलै महिन्यात झालेल्या पावसाने व पैनगंगा , खूनी या नदीला आलेल्या पुराने तालुक्यात हजारे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली.त्यात कोवळे पिक सडून गेले.सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पुरामुळे खरडून गेली.असून पावसाची रिपरिप सुरूच असून जमीन दलदल झाली आहे . यामुळे उत्पादन घट येण्याची शक्यता आहे.यात चिखलडोह येथे तीन दिवस आधी दोन घरे पडली, पैनगंगा नदी तिरावरचे वेडद पासून खातेरा, बैलमपूर, राजूर, हिरापूर जुने, हिरापूर नवीन, मांगली, गाडेघाट, धानोरा, दुर्भा, पाटण, दिग्रस, कमळवेली, सतपल्ली, वोली, डोरली, टाकळी या भागातील शेकडो हेकटर वरील पिकाचे अतिशय नुकसान झाले.
परंतु अजून प्रशासनाकडून पंचनाम करण्यात आले नाही, कारण पूरसदृश परिस्थिती अजून कायमच आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा, व पुरामुळे झालेले नुकसान झाले आहे, त्यांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे करिता युवक काँग्रेस वणी विधानसभा यांचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, पंचनामे त्वरित न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

यावेळी राहुल दांडेकर अध्यक्ष वणी विधास युवा कॉग्रेस,संदिप बुर्रेवार सभापती कृ . उ. बा. समिती , निलेश येल्टीवार सरपंच दिग्रस , वासुदेव विधाते , हरिदास गुर्जलवार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .