मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील सगनापुर व सराटी येथे सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक रेविचंद वासुदेव जनबंधु यांना पंचायत समिती मारेगाव यांनी सन 2019 व 2020 या वर्षात तालुक्यातील नरसाळा ग्रामपंचयतला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून दिला होता.गाव हागणदारी मुक्त केले होते.आणि गावातील अनेक विकास कामे केल्या मुळे त्यांना ग्रामीण विकासामध्ये केलेल्या प्रशंसनीय कार्याच्या गौरवार्थ सन्मानपत्र व सत्कार करण्यात आला.

आदर्श ग्रामसेवक यांना पुरस्कार देण्यात आला आहे.ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 27 जुलै 2022 रोज बुधवारला जी. प. यवतमाळ मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जी. प. यवतमाळ येथे प्रदान करण्यात आले व सपत्नीक सत्कार करण्यात आला.
