मारेगाव येथील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव : येथील कान्हाळगाव मार्गावर कडेला वार्ड नंबर 13 मध्ये वास्तव्यास राहणाऱ्या अनिल चंपत आत्राम वय सुमारे 28 वर्ष याला स्वताच्या घरी कुलरचा शॉक लागल्याची घटना उघडकीस आली.असून ही घटना आज दिनांक 1ऑगस्ट 2022 रोज सोमवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक कुलरचा शॉक लागल्याने अनिलचा मृत्यु झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अनिल हा पानठेला चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याला प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले.पण तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारा आधीच मृत घोषित केले.अनिल यांचे पश्चात आई,पत्नी,भाऊ,बहीण असा आप्तपरीवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.