दांडगाव येथील घटणा.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात :- दांडगाव येथील माणस रामकृष्ण शेंबळकर वय सुमारे 14 वर्ष यांने स्वतःचा घरातली लोखंडी अँगलला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आज दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोज गुरुवारला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकिस आली.
तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही. अशीच मन हेलावून टाकणारी घटना आज दिनांक 11 ऑगस्ट 2022 ला घडली. वर्धा नदीच्या तिरावर असलेल्या छोट्याशा दांडगाव या गावामध्ये ह्रदयद्रावक घटना घडली. वेगवेगळ्या करणांनी मोठ्यांनी आत्महत्या केलेल्या बघितल्या. आता हा मोर्चा बालकांकडे वळल्याचे दिसत आहे.
येथील माणस रामकृष्ण शेंबळकर वय सुमारे 14 वर्षीय बालकाने आपल्या राहत्या घरी असलेल्या लोखंडी अँगलला दोराच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी ही घटना नक्कीच मनाला चटका लावून जाणारी आहे. मानस हार्दिक लहान असतांनाच त्याची आई त्याला सोडून गेली. त्यानंतर शेतमजूरी करणाऱ्या आपल्या वडिलांसोबत राहत होता. त्याला एक मोठा भाऊ असून तो 10 व्या वर्गात शिकत आहे.
मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व त्या नंतर त्याला उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली बीट जमदार रजनीकांत पाटील, विनय राठोड करत आहे..