ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी दाबाने पाणी येत असल्याने शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेच्या माहितीनुसार, कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातून येणाऱ्या पाण्याने जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरता येत नाहीत. त्यामुळेच काही प्रभागांमध्ये अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही भागात दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा चक्क बंद असल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अचलपूर नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्या परिसरात टँकर पाठवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुख्याधिकारी धीरज गोहाड, अभियंता मनिष शर्मा, जलसंपदा अभियंता चिरायु मनोहर, नगरसेवक राज पाटील यांनी धरण स्थळी भेट देऊन आवश्यक तांत्रीक बाबी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे देवगांव येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील तांत्रीक बाबी जाणून घेत सबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती उपाययोजना करण्याबाबत सुचना केल्या. तर दुसरीकडे पाणी समस्येवर काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.तर काही भागात दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा चक्क बंद असल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाकडून उपाययोजनेवर भर चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे तात्पुरती पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाशी सतत संपर्क ठेवून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे, त्या भागांना प्राधान्याने पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ब्राम्हणसभा सह इतर भागातील पाणीटंचाईसाठी लवकरच कायमस्वरुपी तोडगा काढल्या जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर